धोंडोपंतांची ही अजून एक सशक्त गजल. मूळ गजलेतील काही निवडक शेर मी चाल लावण्यासाठी घेतलेत. चाल ऐकून आपले मत जरूर नोंदवा.
मंडळी,सांगावयास आनंद होतोय की ही माझी ५०वी चाल ठरलेय.
जाता जाता
जिथे तिथे मी हर्ष पेरला... जाता जाता
आनंदाचा मळा फुलवला... जाता जाता
समोर तू येताच अचानक मी गडबडलो
एकच ठोका हृदयी चुकला... जाता जाता
दोन शेर लिहिल्यावर होती गझल रखडली
तू दिसल्यावर तिसरा सुचला... जाता जाता
असा काय गंभीर गुन्हा मी केला आहे?
एकच चिमटा तुला काढला... जाता जाता
तुझे इशारे तुझ्या खुणा लाजवाब होत्या
अर्थ मला पण उशिरा कळला... जाता जाता
हासत खेळत भेट आपुली झाली तरिही
कंठ का बरे तुझा दाटला... जाता जाता
खूप प्रयासाने थोपवले होते अश्रू
बांध शेवटी उगीच फुटला... जाता जाता
"संवादाची तुझ्या ’अगस्ती’ ही तर किमया"
"रडणाराही अखेर हसला... जाता जाता"
कवी:धोंडोपंत
चाल इथे ऐका.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
गंगाधर मुट्यांच्या ह्या भारताच्या तिरंगी ध्वजाबद्दलच्या काव्यबद्ध भावना वाचून मलाही उचंबळून आले आणि त्यातच ही चाल सुचली...ऐकून सांगा..कशी ...
-
ऊठ मर्दा ऊठ आवळून घे मूठ हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट सत्तेपुढे शहाणपण जेव्हा व्यर्थ जाते माणुसकीचे लचके तोडून लाचखोर खाते पौरुषाच्य...
-
व्यवसायाने ज्योतिषी असणारे धोंडोपंत आपटे हे महाजालावरचे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. कविता,गजल आणि गद्य लेखन ह्या तिन्ही प्रकारात त्यांचा ह...
२ टिप्पण्या:
अभिनंदन बुवा,
याच वेगाने २००९ याच वर्षात शंभरीही गाठाल याची खात्री आहे. पुढील संगीतप्रवासासाठी शुभेच्छा
धन्यवाद पंडीतजी!
कर्ते करविते तर आपणच आहात.
टिप्पणी पोस्ट करा