रविवार, २८ जून, २००९

पावसाची बंदिश!

क्रांतीला मी आवाहन केले की मला एखादी बंदिश पाऊस ह्या विषयावर हवेय आणि तिने काही तासातच ही छानशी बंदिश मला करून पाठवली. ही बंदिश आणि त्याची चाल आवडते का ते सांगा.

पावसाची बंदिश!

रिमझिम बरसत अंगणी तुषार
मन लहरत गाई मेघमल्हार ॥

घन गरजत जणु देत इशारा
तनमन पुलकित झेलुन धारा
फुलुन येइ मनमयुरपिसारा
धरतीला नवतीचा शृंगार ॥

कवयित्री:क्रान्ति

चाल इथे ऐका.

हीच चाल संगीतसाजासह अनिताताई आठवले ह्यांच्या आवाजात ऐका.

मौन तुझे!

क्रान्तिची ही अजून एक सहजसुंदर आणि हळूवार कविता. त्याची चालही त्यातच दडली होती.


मौन तुझे

बोल एकदा काहितरी रे
मौन तुझे घायाळ करी रे

कातर हळवी सांज गातसे
तरल विराणी दर्दभरी रे

श्रावणातही तळमळते मी
झेलुनिया अलवार सरी रे

जाणवते ती तुझी असोशी
इथे दाटतो श्वास उरी रे

देहच उरतो माझ्यापाशी
मन घुटमळते तुझ्या घरी रे

अंतरण्याने अंतर वाढे
मिटव दुरावा हा जहरी रे

पंचप्राण ज्यांच्यात गुंतले
छेड पुन्हा त्या स्वरलहरी रे

कवयित्री:क्रान्ति

इथे चाल ऐका.

शारदास्तुती!