बर्याच दिवसांनी दीपिका जोशी ह्यांची ही सहजसुंदर कविता वाचनात आली आणि लगेच एक चाल सुचली.
ऐकून सांगा, कशी वाटतेय?
आज मिलन होणार गं...
मनमोर नाचणार गं..
आज मिलन होणार गं..
निशिगंध फुलोरा दरवळतो
गुंजनात भ्रमर सैरभैरतो
मोहरली धरती, आसमंत हसणार गं
आज मिलन होणार गं
चढणार साज ह्या सुरांना
नाद पाउलीच्या पैंजणांना
स्वर भारलेले, एक तान छेडणार गं
आज मिलन होणार गं...
कळ्या नाजूक समयीच्या
खुणवणार बटा भाळीच्या
अंग अंग वसंती आज मी फुलणार गं
आज मिलन होणार गं
कवयित्री: दीपिका जोशी
ऐकून सांगा, कशी वाटतेय?
आज मिलन होणार गं...
मनमोर नाचणार गं..
आज मिलन होणार गं..
निशिगंध फुलोरा दरवळतो
गुंजनात भ्रमर सैरभैरतो
मोहरली धरती, आसमंत हसणार गं
आज मिलन होणार गं
चढणार साज ह्या सुरांना
नाद पाउलीच्या पैंजणांना
स्वर भारलेले, एक तान छेडणार गं
आज मिलन होणार गं...
कळ्या नाजूक समयीच्या
खुणवणार बटा भाळीच्या
अंग अंग वसंती आज मी फुलणार गं
आज मिलन होणार गं
कवयित्री: दीपिका जोशी