श्यामलीची ही एक साधी,सोपी रचना....मन! लोकगीताच्या अंगाने जाणारी हिची चाल कशी वाटतेय...ऐकून सांगा.
मन!
मन एक सान पक्षी
मन रानभर नक्षी
मन पिसारा पिसारा
मन मोठाच पसारा
मन भीती मन प्रिती
मन भुणभूण किती
मन आठवे साठवे
पुन्हा जुनेच नव्याने
मन कैरीची गं फोड
नाही कसलीच तोड
मन साजण साजण
गाली चढते तोरण
मन माय मन तात
मन सखीचा गं हात
मन जखम जखम
मन घालते फुंकर
मन भास मन त्रास
लक्ख उजेडाची आस
मन चकव्याचे फूल
पुन्हा पुन्हा देई हूल
कवयित्री:श्यामली
चाल ऐका.
मंगळवार, २९ सप्टेंबर, २००९
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
गंगाधर मुट्यांच्या ह्या भारताच्या तिरंगी ध्वजाबद्दलच्या काव्यबद्ध भावना वाचून मलाही उचंबळून आले आणि त्यातच ही चाल सुचली...ऐकून सांगा..कशी ...
-
रेमी डिसोजा हे नाव मला तसे नवीन असले तरीही महाजालावर पक्के मुरलेले हे व्यक्तीमत्व दिसतंय. मराठी आणि इंग्रजीमधून ह्यांनी गद्य आणि पद्य लेखन ख...
-
व्यवसायाने ज्योतिषी असणारे धोंडोपंत आपटे हे महाजालावरचे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. कविता,गजल आणि गद्य लेखन ह्या तिन्ही प्रकारात त्यांचा ह...