सुस्वागतम्! नमस्कार मंडळी! "त्यांची कविता माझे गाणे" हा एक एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना माझ्या कुवतीप्रमाणे चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येतील आणि त्याच बरोबर त्यांच्या चालीही ऐकता येतील. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! आपल्याकडून स्पष्ट आणि परखड मतांची अपेक्षा आहे ज्यामुळे मला इथे सुधारणा करता येतील. आपल्या मार्गदर्शनाचा फायदा घेण्यास मी उत्सुक आहे.
मी लावलेल्या चाली जर कुणाला वापराव्याश्या वाटल्या तर त्या कुणीही खुशाल वापरू शकतं...त्यासाठी माझ्या परवानगीची गरज नाही...
मात्र, इथल्या कविता वापरायच्या असतील तर संबंधित कवी/कवयित्रींची वैयक्तिक परवानगी घ्यावी लागेल हे कृपया लक्षात असू द्या ! अन्यथा ती चोरी ठरेल.

गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१०

नको आणखी.

जयश्रीची ही नवी गजल वाचली  आणि त्यातल्या मला आवडलेल्या  काही निवडक द्विपदींचा समावेश करून  त्यांना लावलेली चाल ध्वनिमुद्रित केली. ऐकून सांगा  कशी वाटते.

नको आणखी

फुलणे नव्याने नको आणखी
उमलून मिटणे नको आणखी

घायाळ व्हावे पुन्हा मीच का
इष्कात झुरणे नको आणखी

गंधात न्हालो तुझ्या साजणी
निशिगंध चाफे नको आणखी

येणे तुझे क्षणभराचेच का
पेटून विझणे नको आणखी


नजरेत जरबी कट्‌यारी तुझ्या
बंदी, पहारे नको आणखी

धुंदी चढावी सुरांनी तुझ्या
कुठले बहकणे नको आणखी

जगतोच आहे तुझ्याही विना
आधार फसवे नको आणखी

जवळीक नाही अताशा कुठे
जखडून घेणे नको आणखी

कवयित्री: जयश्री अंबासकर


६ टिप्पण्या:

कांचन कराई म्हणाले...

काका, चाल सुरूवातीला चांगली लागली होती मात्र, ’गंधात न्हालो तुझ्या साजणी...’ पासून थोडी निराळी झाली आहे असं वाटतं. थोडी नाट्यगीतासारखी झाली आहे चाल.

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद कांचन.
>>>थोडी नाट्यगीतासारखी झाली आहे चाल.

माझा नैसर्गिक कल रागदारीकडे असल्याने कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी हे असं होतंच. :)
म्हणतात ना...आदतसे मजबूर..तसेच काहीसे.

जयश्री म्हणाले...

देवकाका.शुक्रिया !! माझ्या अजून एका कवितेला हा सन्मान दिल्याबद्दल.

चाल छान जमलीये. कांचन म्हणतेय ते बरोबर आहे....!! शेवटलं कडवं सगळ्यात जास्त आवडलं !

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद जयश्री.

अनामित म्हणाले...

वेळ चांगला जातो. तुमचा आवाज कमावलेला आहे.

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद प्रकाशजी.