सुस्वागतम्! नमस्कार मंडळी! "त्यांची कविता माझे गाणे" हा एक एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना माझ्या कुवतीप्रमाणे चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येतील आणि त्याच बरोबर त्यांच्या चालीही ऐकता येतील. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! आपल्याकडून स्पष्ट आणि परखड मतांची अपेक्षा आहे ज्यामुळे मला इथे सुधारणा करता येतील. आपल्या मार्गदर्शनाचा फायदा घेण्यास मी उत्सुक आहे.
मी लावलेल्या चाली जर कुणाला वापराव्याश्या वाटल्या तर त्या कुणीही खुशाल वापरू शकतं...त्यासाठी माझ्या परवानगीची गरज नाही...
मात्र, इथल्या कविता वापरायच्या असतील तर संबंधित कवी/कवयित्रींची वैयक्तिक परवानगी घ्यावी लागेल हे कृपया लक्षात असू द्या ! अन्यथा ती चोरी ठरेल.

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१०

जागलं पाहिजे

तुषार जोशीच्या ह्या कवितेला सुचलेली एक झटपट चाल ऐका.

जागलं पाहिजे


आता कंटाळा खूप झाला
कामाला लागलं पाहिजे
स्वप्नांच्या पूर्तीसाठी
आता जागलं पाहिजे


मला जमत नाही म्हणून
आता चिडायचं नाही
माझं कसं होईल असं
म्हणत कुढायचं नाही

कमकुवत शब्दांना
पुरून टाकलं पाहिजे
स्वप्नांच्या पूर्तीसाठी
आता जागलं पाहिजे

येत नाही तिथे तिथे
प्रयत्न करीन म्हणायचं
सर्व अडचणींना
अगदी पुरून उरायचं

दुर्दम्य आशावाद
घेऊन जगलं पाहिजे
स्वप्नांच्या पूर्तीसाठी
आता जागलं पाहिजे

  तुषार जोशी, नागपूर


इथे चाल ऐका

४ टिप्पण्या:

Rajesh Shelar म्हणाले...

Hi Pramod,
Kivita vachun ani ayekun kharch jagala pahije.

Keep up :-)

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद राजेश.

माझी दुनिया म्हणाले...

चाल छान आहे. तश्या त्या नेहमीच असतात पण अनावश्यक आलापीचा मोह टाळता आला तर चाल जास्त खुलेल.

मी अत्त्यानंद म्हणाले...

मादू, ह्यात कुठे आहे आलापी? :(