गुरुवार, २८ जुलै, २०११

पिया प्यार भरी ये छुअन

पिया प्यार भरी ये छुअन
मोरे अंग अंग थिरकन
बांधो बाहुपाश बंधन
तुम्हे प्रीत मेरी अर्पण

मुख लालिमा दमके कंचन
रूप रंग निखरा कहे दर्पण
हर्षित छेडित सुगन्धित सुमन
पुलकित रोमांचित उल्हासित मन

रंग तोरे रंगा ये कण कण
साथ प्यार भरा, सुखमय जीवन
किलकारियों से गूंजा घर आँगन
कभी ख़त्म न हो ये सपन

पिया प्यार भरी ये छुअन
मोरे अंग अंग थिरकन
बांधो बाहुपाश बंधन
तुम्हे प्रीत मेरी अर्पण 

कवयित्री: प्रिती कोलेकर    

ह्या कवितेची चाल ऐका.

जपमाळ

बा भगवंता तुला, सांग किती मी स्मरावे
कसे कितीक द्यावे मी, आणखी पुरावे।
नाम जपावे जपावे, मन जपमाळ व्हावे
का पावशी न देवा तुझेच तुजला ठावे॥

कवयित्री: कामिनी केंभावी(श्यामली)
ह्या चारोळीला मला सुचलेली चाल ऐका.

स्पंदन!

शरीराचे जरी मिटती डोळे
स्वप्नांचे ना मिटो कधीही
स्वप्नांसाठी प्रीत चालते
जन्मांची मग सप्तपदी ही

मांडीवरती निजवून देती
डोळ्यांसाठी स्वप्न माऊली
पहाट होता रूप धारिती
या देहाची जशी सावली

हृदयामध्ये शिरतो साजण
डोळ्यांमधूनी स्वप्नमिषाने
रास रंगतो आठवणींचा
स्पंदनझोका म्हणतो गाणे

भिजल्या भिजल्या आठवणींचे
स्वप्न पेरिती गुलाब नयनी
कधी वाहती विरहाने अन
जसे चांदणे डोळ्यांमधूनी

प्रणयाचा हा स्पर्श लाभता
असा सांडतो स्वप्नांचा मद
अदलाबदली स्वप्नांची मग
ओठांमधूनी होते अलगद

कवी: उमेश कोठीकर

ह्या कवितेला मला सुचलेली चाल ऐका.

शनिवार, २३ जुलै, २०११

दु:ख!

साहतो मी दु:ख देवा
अजून किती साहु रे
जाळशील अजून किती
अजून किती रक्त रे..!

संपु दे यात्रा माझी
त्राण नाही राहिले
प्रेत नुसते चालले हे
प्राण तर केव्हांच गेले

वेदना ही कोणती..?
कि मेल्यावरी पण जाळते
हि कोणती पेटली चिता ..?
कि प्रेत माझे किंचाळते..!!

कवी: चंद्रशेखर केशव गोखले

ही कविता वाचून मला सुचलेली चाल ऐका.

शुक्रवार, २२ जुलै, २०११

वाटते बोलायचे राहून गेले



आपले गाणे पुन्हा गाऊन गेले;
भेटले जे,ते चुना लावून गेले.

हे फुकट आहे कळाले त्यांस जेव्हा,
पोट भरलेले,तरी खाऊन गेले.

विश्वसुंदर स्त्री करी अद्भूत किमया;
आंधळे आले ,तिला पाहून गेले.

मतलबी झालो इथे मी, काल जेव्हा;
आप्त माझे पाठ मज दावून गेले.

माफ केले पाप ते सारे तुझे मी;
आसवांसमवेत जे वाहून गेले.

पक्ष कसले?काय्?हे कळते न ज्यांना,
आपला झेंडा इथे लावून गेले.

जाहले 'कैलास' सारे सांगुनी पण,
वाटते,'बोलायचे राहून गेले'!

कवी: डॉक्टर कैलाश गायकवाड

ही गझल वाचून मला सुचलेली चाल ऐका....सोईसाठी काही निवडक द्विपदीच घेतलेल्या आहेत.

महिमा रामनाम

रामनाम जिथे
अंतर्यामी वसे
तिथे नांदतसे
सुखशांती

ऐश्या घरामध्ये
नांदे सीताराम
जिव्हाळा सप्रेम
एकरूप

गुरुराया तुझा
असो आशीर्वाद
आमुचे प्रमाद
घाल पोटी

गुरुराया तुझी
काय वर्णू कीर्ती
आमुची रे मती
तोकडीच

कवी: चंद्रशेखर केशव गोखले

हे काव्य वाचून मला ही चाल सुचली...ऐका तर!

गुरुवार, ७ जुलै, २०११

निजधामा नेई



मनाच्या अवस्था
आसक्ती विरक्ती
विठू तुझी भक्ती
हेच सत्य ||

तुझ्या दर्शनाचा
अहोरात्र ध्यास
येताजाता श्वास
नाम जपे ||

नको नको झाला
मायेचा पसारा
भौतिकाचा सारा
डामडौल ||

प्रपंच मी केला
नेटकाच देवा
आता तुझी सेवा
हेच ब्रीद ||

तुवा सोपविले
कार्य पुरे होई
निजधामा नेई
पांडुरंगा ||

कवयित्री: क्रान्ति


क्रांतिचा हा अभंग वाचून मला तो चालवावासा वाटला...कसा तो ऐका.