सुस्वागतम्! नमस्कार मंडळी! "त्यांची कविता माझे गाणे" हा एक एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येतील आणि त्याच बरोबर त्यांच्या चालीही ऐकता येतील. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!


*इथल्या कविता वापरायच्या असतील तर संबंधित कवी/कवयित्रींची वैयक्तिक परवानगी घ्यावी लागेल हे कृपया लक्षात असू द्या ! अन्यथा ती चोरी ठरेल.

शुक्रवार, ३ डिसेंबर, २०१०

गगनावरी तिरंगा... !

गंगाधर मुट्यांच्या ह्या भारताच्या तिरंगी ध्वजाबद्दलच्या  काव्यबद्ध भावना वाचून मलाही उचंबळून आले आणि त्यातच ही चाल सुचली...ऐकून सांगा..कशी वाटली ?११ टिप्पण्या:

दिलीप बिरुटे म्हणाले...

गगणावरच्या तिरंग्याला चाल मस्त लावलीच आणि यावेळेस आपलं गायन कानाला जरा गोड वाटलं...!

लगे रहो.


-दिलीप बिरुटे

Gangadhar Mute म्हणाले...

धन्यवाद प्रमोदजी,
फ़ारच सुंदर चाल दिलीय आपण.
आभारी आहे.

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद बिरुटेसाहेब आणि मुटेसाहेब !
आपल्या दोघांना चाल आवडली हे वाचून आनंद झाला.

जयश्री अंबासकर म्हणाले...

मस्त चाल जमलीये काका !!
एकदम तडफदार........आवडेश :)

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद जयश्री.

मीनल गद्रे. म्हणाले...

हुरूप आणणारे शब्द आणि अनुरूप चाल.
क्लासिकल बेज्ड चाल आहे.

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद मीनल.

श्रेया म्हणाले...

जयश्री आणि मीनल ला अनुमोदन.

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद श्रेया.

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

कविता स्फूर्तीदायक आहे. चालीच्या जोडीला धडधडणारा ढोल किंवा तबला असता तर आवेशपूर्ण, जोशभरे वाटले असते. तशी साथ नसल्यामुळे मिळमिळीत वाटते. स्पष्ट लिहिल्याबद्दल क्षमस्व.

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद पंडीतजी....तबला वाजवायला आता तुम्हीच या..पुन्हा एकदा गाईन ते गाणं.