सुस्वागतम्! नमस्कार मंडळी! "त्यांची कविता माझे गाणे" हा एक एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येतील आणि त्याच बरोबर त्यांच्या चालीही ऐकता येतील. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!


*इथल्या कविता वापरायच्या असतील तर संबंधित कवी/कवयित्रींची वैयक्तिक परवानगी घ्यावी लागेल हे कृपया लक्षात असू द्या ! अन्यथा ती चोरी ठरेल.

रविवार, ५ एप्रिल, २००९

प्रेमे नादली पंढरी!
राघव ह्या टोपण नावाने लिहीणारा राहुल पाटणकर हा देखिल एक उमदा कवी आहे. ह्याचा नैसर्गिक कल अध्यात्माकडे असावा त्यामुळे त्याच्या कविता भक्तीरसमय असतात. त्याची ही कविता वाचून जी चाल सुचली ती ऐका..   विवेक काजरेकरांच्या आवाजात.
विवेक काजरेकरांनी ह्या गीताला जो संगीत-साज चढवला आहे तो पूर्णपणे संगंणकीय पद्धतीने.
ह्यात दिमडी,एकतारी,झांज,सतार आणि वायोलिन्सचा वापर केलाय. अर्थात ह्यात प्रत्यक्षपणे कोणतीच वाद्ये वापरलेली नाहीत.


प्रेमे नादली पंढरी

मेघ आषाढाचा गर्जे, गाज गूंजे चराचरी,
प्रेमे नादली पंढरी उभा बघून श्रीहरी!

मी बालक अजाण मन सोडीना पदर!
माझी बालकाची मती त्यास कोठला आधार?

दिंडी चालली माहेरा, वाट ओली अंतरीची!
उभी लेकराच्यासाठी माय सावळी कधीची!!

अश्रू वाहती सहज, भाव कोवळा सांभाळा!
मायभेट उराउरी आज आनंद सोहळा!!

कवी:राघव६ टिप्पण्या:

दिलीप बिरुटे म्हणाले...

व्वा ! काजरेकर साहेब व्वा.......!
आपण संगीतकार आहात हे माहित होतं.....पण गाताही तितकेच हे मात्र माहित नव्हतं..एकदम मस्त !

अवांतर : किती वेळेस म्हटलं प्रमोद देवांना, काजरेकर साहेब, आहेत ओळखीचे तर घ्या तुमच्या चालींना संगीत लावून तर ऐकत नाही ! :)

Nandan म्हणाले...

भक्तिपूर्ण शब्द, सुरेल चाल आणि आवाज असा समसमा संयोग जुळून आला आहे. सुरेख जमलंय गाणं. साग्रसंगीत चाल ऐकायला फार छान वाटली.

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद बिरुटेसाहेब आणि नंदन.
तुमच्या भावना काजरेकरांपर्यंत नक्की पोचवतो.

दीपिका जोशी 'संध्या' म्हणाले...

खूपच झक्कास चाल लावली आहे....देव काका तुम्ही...
आणि विवेक काजरेकरांनी त्याला साग्रसंगीत करून अजूनच मज्जा आणून दिली....खूप खूप आनंद देऊन गेलात दोघं मिळून....
कविता पण छानच आहे....

दीपिका जोशी

vivek म्हणाले...

स्तुतिसुमने उधळणार्‍या सर्व रसिकांचे धन्यवाद.

अहो बिरुटे साहेब, प्रमोदकाका ऐकत नाहीत असं नाही. ते "हात धुवून" मागे लागलेले असतात आमच्या. :-)

ऐकत नाही ते आम्हीच .... हा हा हा

Raghav म्हणाले...

Vivekji,

tumachaa aavaaj chhaan goD aahe ho, maajhIch kavitaa kamI paDatIye jaraa! :)

Pramod kaka,
tumachyaa mUL chaalIlaa saagrasaMgIt chaal laagalyaavar khUpach bahaar yetIye
tumhaa doghaaMchehI manapUrvak aabhaar.

aapalaa
Raaghav