क्रान्तिची अजून एक भक्तीरसपूर्ण कविता. ह्या कवितेची एकच चाल मी विलंबित आणि द्रूत अशा दोन तर्हेने ध्वनीमुद्रित केलेय. ऐकून सांगा कोणती आवडली.
दास!
या मनास लागावा अनवरत ध्यास तुझा
आप, तेज, वायु, धरा, सार्यांतच भास तुझा
तूच मनी, तू नयनी, प्राण तुझे, श्वास तुझा
नाम तुझे मुखी राहो, ध्यानी मनी वास तुझा
अवघड ही वाट तरी आसरा जिवास तुझा
कानी घुमे मुरलीचा नाद आसपास तुझा
नाना रूपांत दिसे आगळा विलास तुझा
मनमोहन, यदुनंदन, यमुनातटी रास तुझा
तारशील भवसागरी, मजसी विश्वास तुझा
देई विसावा चरणी, प्रभु मी रे दास तुझा
कवयित्री: क्रान्ति
दोन्ही प्रकार इथे ऐका.
१)द्रूत!
२)विलंबित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा