सोमवार, ३० जून, २०१४
शनिवार, २१ जून, २०१४
गुरुवार, १९ जून, २०१४
पावसाची प्रतीक्षा!
आजवर अनेक रचनांना चाली लावल्या...मोजदाद मात्र कधीच केली नाही...त्यातल्या काही क्षणिक आनंदासाठी, काही स्वानंदासाठी तर काही वैयक्तिक विनंतीला मान देण्यासाठी होत्या...पण इथे ह्या जालनिशीवर मात्र सगळ्या कधीच चढवल्या नाहीत...आजची, ही माझी, ह्या जालनिशीवरची १५०वी चाल आहे इतकंच ह्या निमित्ताने सांगू इच्छितो.
..अजून पुढे किती? मलाही माहीत नाही. :)
मंगळवार, १७ जून, २०१४
हुषार कोण?
[बालकविता]
रोज सकाळी शाळेत जातो
पाढे बाराखडी शाळेत शिकतो ..
बाईंच्यासमोर पुस्तक वाचतो
पाढे धाडधाड म्हणून दाखवतो ..
मन लावून अभ्यास करतो
प्रश्नांचे उत्तर भरभर देतो ..
बाई "वा वा छान" म्हणतात
पाठीवर शाबासकी देतात ..
मला एक समजत नाही
कसे विचारावे कळत नाही ..
बाईना पाढे येत नाहीत का
बाईना वाचता येत नाही का ..
वर्गात पुस्तक मीच वाचतो
वर्गात पाढे मीच म्हणतो .. !
कवी: विजयकुमार देशपांडे
रोज सकाळी शाळेत जातो
पाढे बाराखडी शाळेत शिकतो ..
बाईंच्यासमोर पुस्तक वाचतो
पाढे धाडधाड म्हणून दाखवतो ..
मन लावून अभ्यास करतो
प्रश्नांचे उत्तर भरभर देतो ..
बाई "वा वा छान" म्हणतात
पाठीवर शाबासकी देतात ..
मला एक समजत नाही
कसे विचारावे कळत नाही ..
बाईना पाढे येत नाहीत का
बाईना वाचता येत नाही का ..
वर्गात पुस्तक मीच वाचतो
वर्गात पाढे मीच म्हणतो .. !
कवी: विजयकुमार देशपांडे
सोमवार, १६ जून, २०१४
शाळा
(बालकविता)
आई स्वैपाकघरात फिरणार
बाबा ऑफिसात काम करणार ..
दादा बाहेर क्रिकेट खेळणार
ताई सारखी मैत्रिणीत असणार ..
कुणीही शाळेत नाही जाणार
मला मात्र तिथे पाठवणार .. !
आजपासून मी शाळेत जाणार
शाळेत जाऊन खूप शिकणार ..
सर्वांपेक्षा मोठ्ठा मी होणार
सर्वांना घरात मी शिकवणार ..
अ आ ई काढायला लावणार
शिकवून त्यांना शहाणे करणार ..
माझे त्यानी ऐकले नाहीतर
एकदोन मोजत उठाबशा काढणार .. !
कवी: विजयकुमार देशपांडे
आई स्वैपाकघरात फिरणार
बाबा ऑफिसात काम करणार ..
दादा बाहेर क्रिकेट खेळणार
ताई सारखी मैत्रिणीत असणार ..
कुणीही शाळेत नाही जाणार
मला मात्र तिथे पाठवणार .. !
आजपासून मी शाळेत जाणार
शाळेत जाऊन खूप शिकणार ..
सर्वांपेक्षा मोठ्ठा मी होणार
सर्वांना घरात मी शिकवणार ..
अ आ ई काढायला लावणार
शिकवून त्यांना शहाणे करणार ..
माझे त्यानी ऐकले नाहीतर
एकदोन मोजत उठाबशा काढणार .. !
कवी: विजयकुमार देशपांडे
रविवार, १५ जून, २०१४
शुक्रवार, १३ जून, २०१४
ये रे ये रे पावसा...
ही आहे आपली पारंपारिक रचना...
ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा
ये गं येगं सरी
माझे मडके भरी
सर आली धावून
मडके गेले वाहून
ही रचना मला अशा तर्हेने गावीशी वाटली...तुला देतो पैसा..ह्या ओळीत मी किंचित बदल करून....तुला मी देतो रे पैसा...असे म्हटलंय.
ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा
ये गं येगं सरी
माझे मडके भरी
सर आली धावून
मडके गेले वाहून
ही रचना मला अशा तर्हेने गावीशी वाटली...तुला देतो पैसा..ह्या ओळीत मी किंचित बदल करून....तुला मी देतो रे पैसा...असे म्हटलंय.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
गंगाधर मुट्यांच्या ह्या भारताच्या तिरंगी ध्वजाबद्दलच्या काव्यबद्ध भावना वाचून मलाही उचंबळून आले आणि त्यातच ही चाल सुचली...ऐकून सांगा..कशी ...