सोमवार, १६ जून, २०१४

शाळा

 (बालकविता)
आई स्वैपाकघरात फिरणार
बाबा ऑफिसात काम करणार ..
दादा बाहेर क्रिकेट खेळणार
ताई सारखी मैत्रिणीत असणार ..
कुणीही शाळेत नाही जाणार
मला मात्र तिथे पाठवणार .. !

आजपासून मी शाळेत जाणार
शाळेत जाऊन खूप शिकणार ..


सर्वांपेक्षा मोठ्ठा मी होणार
सर्वांना घरात मी शिकवणार ..

अ आ ई काढायला लावणार
शिकवून त्यांना शहाणे करणार ..

माझे त्यानी ऐकले नाहीतर
एकदोन मोजत उठाबशा काढणार .. !


कवी: विजयकुमार देशपांडे