सुस्वागतम्! नमस्कार मंडळी! "त्यांची कविता माझे गाणे" हा एक एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना माझ्या कुवतीप्रमाणे चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येतील आणि त्याच बरोबर त्यांच्या चालीही ऐकता येतील. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! आपल्याकडून स्पष्ट आणि परखड मतांची अपेक्षा आहे ज्यामुळे मला इथे सुधारणा करता येतील. आपल्या मार्गदर्शनाचा फायदा घेण्यास मी उत्सुक आहे.
मी लावलेल्या चाली जर कुणाला वापराव्याश्या वाटल्या तर त्या कुणीही खुशाल वापरू शकतं...त्यासाठी माझ्या परवानगीची गरज नाही...
मात्र, इथल्या कविता वापरायच्या असतील तर संबंधित कवी/कवयित्रींची वैयक्तिक परवानगी घ्यावी लागेल हे कृपया लक्षात असू द्या ! अन्यथा ती चोरी ठरेल.

गुरुवार, १९ जून, २०१४

पावसाची प्रतीक्षा!

आजवर अनेक रचनांना चाली लावल्या...मोजदाद मात्र कधीच केली नाही...त्यातल्या काही क्षणिक आनंदासाठी, काही स्वानंदासाठी तर काही वैयक्तिक विनंतीला मान देण्यासाठी होत्या...पण इथे ह्या जालनिशीवर मात्र सगळ्या कधीच चढवल्या नाहीत...आजची, ही माझी, ह्या जालनिशीवरची १५०वी चाल आहे इतकंच ह्या निमित्ताने सांगू इच्छितो. ..अजून पुढे किती? मलाही माहीत नाही.  :)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: