सुस्वागतम्! नमस्कार मंडळी! "त्यांची कविता माझे गाणे" हा एक एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना माझ्या कुवतीप्रमाणे चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येतील आणि त्याच बरोबर त्यांच्या चालीही ऐकता येतील. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! आपल्याकडून स्पष्ट आणि परखड मतांची अपेक्षा आहे ज्यामुळे मला इथे सुधारणा करता येतील. आपल्या मार्गदर्शनाचा फायदा घेण्यास मी उत्सुक आहे.
मी लावलेल्या चाली जर कुणाला वापराव्याश्या वाटल्या तर त्या कुणीही खुशाल वापरू शकतं...त्यासाठी माझ्या परवानगीची गरज नाही...
मात्र, इथल्या कविता वापरायच्या असतील तर संबंधित कवी/कवयित्रींची वैयक्तिक परवानगी घ्यावी लागेल हे कृपया लक्षात असू द्या ! अन्यथा ती चोरी ठरेल.

सोमवार, १९ मे, २०१४

रती!

दोन वेगळे ताल वापरून गाण्याचा प्रयत्न केलाय...

ताल: केहरवाताल: त्रिताल

३ टिप्पण्या:

Ashok Patil म्हणाले...

प्रमोद जी....

मध्यरात्री मी घरी परतलो...लग्नकार्यक्रमानिमित्ताने बाहेरगावी गेलो असल्याने...थोड्या वेळाने मी कॊम्प्युटर चालू केला आणि जालावर आल्याआल्या आपला "रती" संदेश दिसला...हर्षाने अगदी ते गीत ऐकले आणि ते ऐकत असतानाच भारतीच्या शब्दसामर्थ्याची जादू आणखीनच उलगडत गेली. पहिली चाल ऐकल्यानंतर दुसरीही ऐकण्याचा मोह झाला...आणि विशेष म्हणजे पहिल्यापेक्षा या दुस-या तालाने मनी घर केले. सुंदर अनुभव. धन्यवाद.

aruna म्हणाले...

navin navin experiments chan vatataat. taal changale basale ahet.

प्रमोद देव म्हणाले...


अशोकराव, दोन्ही चाली ऐकल्यात आणि आवर्जून प्रतिसाद दिलात...दुवा देण्याचे सार्थक झाले. :)

अरूणाताई, तुम्ही नित्यनेमाने माझ्या चाली ऐकता आणि त्यावर सातत्याने प्रतिक्रियाही देता..खूप छान वाटतं...कुणीतरी आवर्जून ऐकतंय...म्हणून.

अशोकराव आणि अरूणाताई, प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!