शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०११

न्या येथून!

तुज दशदिशा
उरे मज काय ?
रे चरण द्वय
देवा तुझे


केलास उशीर 
जरी आजवरी
तृप्त झालो हरी
तुझ्या ठायी !



तुझ्याच कृपेने
आलो इथवर
ही माझी स्थावर
मालमत्ता !


भेटूनि पावलो
हे जगदिश्वरा
आता त्वरा करा
 येथून न्या  !

कवी: सुरेश पेठे
ह्या गीताला मला सुचलेली चाल ऐका.

४ टिप्पण्या:

सुरेश पेठे म्हणाले...

व्वा ! खूप सुंदर. विशेषत: शेवटच्या कडव्याला लावलेला आर्त स्वर एकदम हृदयाला जाऊन भिडतो....कविता लिहितांना मला खुद्द वाटली नव्हती, एव्हढी आर्तता ऐकतांना जाणवते !
मानलं तुम्हाला !
सुरेश पेठे

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद पेठेसाहेब!
ज्या दिवशी प्रथमत: गीत वाचले तेव्हा मनात आलेली चाल आणि आज प्रत्यक्ष ध्वनीमुद्रण करतांनाची चाल...दोन्हीत काहीच साम्य नाहीये...मी पहिली चालच विसरलोय. :)
ही चाल आपल्याला आवडली...भरून पावलो.

mahesh pendse म्हणाले...

khup chan sir. hi mazi sthawar malmutta hya olila suit hoel asa kahi tari liha ani tumahalach te nukki jamel sir. pls arthat tumhala yogya vatla tar please

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद महेश!
स्थावर मालमत्ता...असं पेठेसाहेबांनी म्हटलंय...खरंच,आता त्याबद्दल त्यांनी लिहायला हवं.