ऊठ मर्दा ऊठ
आवळून घे मूठ
हाण त्याच्या टाळक्यात
पायामधला बूट
सत्तेपुढे शहाणपण
जेव्हा व्यर्थ जाते
माणुसकीचे लचके तोडून
लाचखोर खाते
पौरुषाच्या नशेचे, तेव्हा लाव दोन घूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट
अन्यायाची सीमा जेव्हा
मर्यादेला लांघते
तुझे हक्क तुडवून
तिरडीवर बांधते
शेपटी तेव्हा खाली नको, वाघासारखा ऊठ
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट
पोशिंद्याच्या छाताडावर
हरामींच्या मौजा
तेव्हा राज्य करतात
लुटारूंच्या फौजा
सत्ता आणि दलालांची, कर ताटातूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट
माय तुझी बैलावाणी
राबराबून मेली
गल्लीमध्ये मुळं अन्
दिल्लीमध्ये वेली
अभयाने शोध घे, कोणी केली लूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट
कवी: गंगाधर मुटे
ह्या गीताला मला अशी चाल सुचली.
१८ टिप्पण्या:
Are Waa ! Joshpurna
Anil Sonawane
धन्यवाद अनिल.
लई भारी काका :) :)
धन्यवाद सुहास!
छान जमलीये चाल. मस्त.
गायन लैच जोषपूर्ण झालंय.
धन्यवाद बिरुटेसाहेब आणि प्रशांत!
बरेच महीन्यांच्या कालावधीनंतर कान बरे झाले असल्याने, आज पुन्हा जखम करुन घ्यायला आलो. तर चक्क गाणे ऐकून गुदगुल्या झाल्या बरे!! लै भारी!!
;-)
साक्षात, तुम्ही गाणं ऐकलंत म्हणजे बहुदा सूर्य पश्चिमेला उगवला असणार. सहजराव! ;)
मस्त हाणलंय बुवा. एकदम मर्दानी झाली आहे चाल. लगे रहो !!!!
धन्यवाद पंडितजी!
जबरदस्त झाली प्रमोददा.
धन्यवाद मुटेसाहेब.
चाल तुमच्या काव्यातच आहे..मी फक्त ती लोकांसमोर मांडली..इतकंच! :)
१५ ऑगस्ट जवळ येतेय म्हणून हा जोश ? पण नाही खरोखरच काव्यालाच चाल आहे. काव्य आणि चाल हातात हात घालून आली आहेत. काका, लई झ्याक !
धन्यवाद श्रेया!
पण एखादा तरूण आवाज मिळाला असता तर गाणं अजून भारी झालं असतं.
प्रमोददा,
सध्या आपली तरुणाई कमर लचकवत प्रेमगीते गाण्या-नाचण्यात दंग आहेत. त्यांना फ़ुरसत मिळेतोवर तुम्हीच चालू द्या. :)
लई भारी काका
धन्यवाद महेश!
टिप्पणी पोस्ट करा