गंगाधर मुटे...एक गावाशी आणि मातीशी घट्ट नातं जोडलेला कवीमाणूस. शेतीशी निगडीत अशा ह्या मुटेसाहेबांनी कवितांमध्ये निरनिराळे विषय हाताळलेले आहेत.गजल,हजल,निसर्गकविता, वास्तववादी कविता,गावरान कविता अशा विविध प्रकारे त्यांनी अतिशय सुंदर अशा काव्यरचना केलेल्या आहेत..त्यांची ही एक बहारदार पण तितकीच वास्तववादी कविता पाहा.
सात खिडक्या पुरेशा मी झाकतो तरी
शिरते कशी कळेना ती स्वप्नसुंदरी
जोपासतो अशी ही आम्ही समानता
राधा,टिना,करीना बाजूस श्रीहरी
जोडे सजावटीला एसी-कपाट ते
भाजी-फ़ळास जागा, मात्र उघड्यावरी
मंगळ कह्यात आला, कक्षेत तारका
भैरू अजून खातो कांदा नि भाकरी
जिंकून मीच हरतो, ना जिंकतो कधी
तुमचा लवाद आहे, पंच तुमचे घरी
खेड्याकडून जावे शहराकडे जसे
आकार घटत चोळी, जाते सरासरी
शेती करून मालक होणेच मुर्खता
सन्मान मोल आहे कर अभय चाकरी
कवी: गंगाधर मुटे
चाल इथे ऐका.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा