शुक्रवार, २८ ऑगस्ट, २००९

गंध वार्‍यावर !

नरेंद्र गोळे ह्यांची ही चारोळी वाचली आणि आवडलीही मात्र हिला चाल कशा पद्धतीने लावावी ह्याबद्दल मनात गोंधळ होता. त्यामुळे बरेच दिवस ती बाजूलाच पडून होती. आज अचानक तिच्यासाठी चाल सुचली आणि ती तिच्या अर्थाला अनुकुल आहे असे वाटले म्हणून इथे तुमच्या अभिप्रायार्थ ठेवत आहे. ऐकून सांगा कशी वाटली?

गंध वार्‍यावर

गंध वार्‍यावर बूचफुलांचा किती |
पाय होती स्थिर, देती ना गती ||
चित्त चालतसे वळणांची वाट ती |
स्वैर धावतसे धुंद आठवांत ती ||

कवी:नरेंद्र गोळे

चाल इथे ऐका.

1 टिप्पणी:

नरेंद्र गोळे म्हणाले...

खासच आहे! गाणे आणि चालही.

’स्थिर’ शब्द मात्र र्‍हस्वच उच्चारायला हवा होता असे वाटते.

पुनर्भेटीचा आनंद होतो आहे. कवितेच्या आणि तुमच्याही.

नरेंद्र गोळे २०१४०७११