बुधवार, १९ ऑगस्ट, २००९

विठू !

क्रान्तिची ही अजून एक सहजसुंदर रचना. ह्याची चाल कशी वाटतेय ऐकून सांगा.

विठू

पुन्हा एकदा गवस विठू
रित्या अंगणी बरस विठू

दर्शन नाही सुगम तुझे
दुरून बघते कळस विठू

संतसंगती सदा घडो,
अता कुठे ते दिवस विठू ?

नित्य तुझा सहवास हवा
तुलाच करते नवस विठू

तुझ्या दयेचे अमृत दे,
जळते माझी तुळस विठू

घराकडे जा, नको करू
रखुमाईचा विरस विठू

कवयित्री: क्रान्ति


चाल इथे ऐका.

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

पारंपारिक चाली येतात का?
ज्ञानेश्वरीच्या ओव्या, तुकारामाचे अभंग, भजनांच्या चाली तुमच्या आवाजात ध्वनी मुद्रित करून ठेवा. आता त्या लुप्त होत चालल्या आहेत.

प्रमोद देव म्हणाले...

प्रकाशराव,अभंगाच्या वगैरे पारंपारिक चाली ऐकण्यासाठी आपल्याला कोणत्याही भजन मंडळींचा कार्यक्रम ऐकावा लागेल. खूपच छान छान चाली असतात त्यांच्या आणि त्या चाली गाणार्‍या बुवांचे आवाजही मस्त असतात. ह्या चाली परंपरेने चालत आलेल्या आहेत. ह्यापुढेही ही परंपरा सुरुच राहील..ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही.

माझ्या बाबतीत इतकेच सांगता येईल की कुणाचीच नक्कल करायची नाही ह्या भावनेतून ह्या चाली रचायचा मी माझ्या अल्प मतीने प्रयत्न करतोय .
कितपत जमतंय हे आपल्यासारख्या रसिकांनीच ठरवायचंय.