रविवार, २८ जून, २००९

पावसाची बंदिश!

क्रांतीला मी आवाहन केले की मला एखादी बंदिश पाऊस ह्या विषयावर हवेय आणि तिने काही तासातच ही छानशी बंदिश मला करून पाठवली. ही बंदिश आणि त्याची चाल आवडते का ते सांगा.

पावसाची बंदिश!

रिमझिम बरसत अंगणी तुषार
मन लहरत गाई मेघमल्हार ॥

घन गरजत जणु देत इशारा
तनमन पुलकित झेलुन धारा
फुलुन येइ मनमयुरपिसारा
धरतीला नवतीचा शृंगार ॥

कवयित्री:क्रान्ति

चाल इथे ऐका.

हीच चाल संगीतसाजासह अनिताताई आठवले ह्यांच्या आवाजात ऐका.

७ टिप्पण्या:

P A Ramchandra म्हणाले...

तुमची पावसाची बंदिश आवडली.

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद रामचंद्रजी!

eksakhee म्हणाले...

malaa hee chal atishay aavadalee
sonali

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद सोनाली.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

काका, ही चाल तर मस्तच जमलीय. पण तुम्ही नेहमी कठीण चाली का लावता? गुणगुणताना त्रास होतो ;-)

प्रमोद देव म्हणाले...

कांचन,कठीण आणि सोपे असे काही माझ्या मनात नसतं. जे सुचतं तसं मी म्हणत जातो.
काही ठरवून करण्याइतकं गाण्याचे सखोल ज्ञान मला नाही.

विजयकुमार देशपांडे म्हणाले...


चालीबरहुकूम कविता गायली असती तर .. अधिक छान वाटले असते.