सोमवार, ६ एप्रिल, २००९

प्रेमरंग!

प्रेमरंग ही सुवर्णमयीची अजून एक सहजसुंदर कविता वाचा आणि त्या कवितेची चालही ऐका.

प्रेमरंग

प्रेमरंग मज भिजवुन गेला उमलुन आले फूल नवे
आयुष्याच्या माळावर तृप्तीला आले कोंब नवे

तुला पाहण्या भिरभिर फिरतो , तुला भेटण्या बहाणे नवे
हृदयामध्ये तुझेच स्पंदन वाटे मजला हवे हवे

बोललीस तू हळूच काही..तिथे थांबले क्षण हळवे
डोळ्य़ामधुनी हसल्या ज्योती उजळून गेले लाख दिवे

आशेच्या फांदीवर माझ्या वसतीला चैतन्यपारवे
सखे व्यापले गगनालाही पसरून माझे पंख नवे

कवयित्री: सुवर्णमयी

रूपक तालातली चाल ऐका.

२ टिप्पण्या:

DJ Ganesh म्हणाले...

फार सुंदर आहे
आणि अर्थ सुद्धा . . .

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद गणेश.