प्राजुची ही अजून एक सहजसुंदर रचना "कृष्णमयी". ह्या कवितेला देखिल चाल कवितेतच सापडली.
कृष्णमयी!
ऐन त्या दुपारी, कालिंदीच्या तिरी
खेळतो मुरारी, पाठशीव..
हसत खेळत, अल्लड गोपिका
अव्खळ राधिका, कान्हा पाही..
घट डोईवर, चाले भराभर
नदी तीरावर, पाण्यासाठी..
भरूनिया कुंभ, घेता डोईवर
खडा घटावर, ट्णकारला..
भिजुनिया चिंब, शहारे सर्वांग
निरखे श्रीरंग, राधिकेला..
चोरून ती उभी, अव्घड ओलेती
सावळ्याची मिठी, अंगभर..
मिटले नयन, सुटला पदर
थरारे अधर, चुंबताना..
म्हणा कृष्णसखी, अथवा सानिका
झाली ही राधिका, कृष्णमयी..
पावरीचा सूर, आज दूर दूर
प्रणयाचा पूर, गोकुळात..
कवयित्री: प्राजु
चाल ऐका.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा