शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०११

तुझ्या डोळ्यात...

तुझ्या डोळ्यात म्हणे
एक प्राणीसंग्रहालय जमलंय

भीतीचा ससा
नजरेची हरणं
त्या दोन मासोळ्या
शांत डोहातल्या ........

कसं काय ठेवतेस त्यांना
पापण्यांच्या पिंज-यात
की भुवयांच्या धाकात?
त्यापेक्षा सोडत का नाहीस त्याना
माझ्या अभयारण्यात?
कवी: डॉ.अशोक

ह्या गीताला मला अशी चाल सुचली.....
                                  

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०११

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०११

दिपावली!

आज मन नव तरंग,
थिरकत मृदंग
हर्ष उमंग,
आनंद अन्तरंग॥

सजे रंगोली रंग रंग
ये दीपावली आपके संग

कवयित्री: प्रिती कोलेकर

ही छोटेखानी कविता मला अशी चालवावीशी वाटली.
त्रितालातली रचना...


केहरव्यातली रचना...

शनिवार, १० सप्टेंबर, २०११

या मनाचं सालं काही, समजत नाही

या मनाचं सालं काही, समजत नाही
जडंल कुणावर काही, उमगत नाही

लाल हिचे गाल कधी
लांब तिचे केस कधी
घारे हिचे डोळे कधी
गोरा तिचा रंग कधी
भावंल कुणाचं काय नेमच नाही
या मनाचं सालं काही समजत नाही

जाईल तिथं घात करील
दिसेल तिला डोळा मारील
ही आली, धड-धड झाली
चाल तिची तुडवून गेली
कुठं, काय, कधी होइल, नेमच नाही
या मनाचं सालं काही समजत नाही

आज पहा हिच्या प्रेमात
उद्या पहा तिच्या नादात
आज म्हणे "ही चांगली"
उद्या म्हणे "तीच बरी"
एकीवर पक्कं कधी बसतंच नाही
या मनाचं सालं काही समजत नाही

कवी: डॉ.अशोक कुलकर्णी
इथे चाल ऐका.