सुस्वागतम्! नमस्कार मंडळी! "त्यांची कविता माझे गाणे" हा एक एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना माझ्या कुवतीप्रमाणे चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येतील आणि त्याच बरोबर त्यांच्या चालीही ऐकता येतील. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! आपल्याकडून स्पष्ट आणि परखड मतांची अपेक्षा आहे ज्यामुळे मला इथे सुधारणा करता येतील. आपल्या मार्गदर्शनाचा फायदा घेण्यास मी उत्सुक आहे.
मी लावलेल्या चाली जर कुणाला वापराव्याश्या वाटल्या तर त्या कुणीही खुशाल वापरू शकतं...त्यासाठी माझ्या परवानगीची गरज नाही...
मात्र, इथल्या कविता वापरायच्या असतील तर संबंधित कवी/कवयित्रींची वैयक्तिक परवानगी घ्यावी लागेल हे कृपया लक्षात असू द्या ! अन्यथा ती चोरी ठरेल.

सोमवार, १३ जुलै, २००९

बरसेल आता पाऊस!

व्यवसायाने ज्योतिषी असणारे धोंडोपंत आपटे हे महाजालावरचे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. कविता,गजल आणि गद्य लेखन ह्या तिन्ही प्रकारात त्यांचा हातखंडा आहे.
हल्लीच त्यांनी लिहीलेली एक कविता वाचली. वाचताक्षणीच एकदम आवडून गेली आणि सहजपणाने एक चालही सुचली. माझ्या, संगीतातील काही दर्दी मित्रांना ऐकवल्यावर त्यांच्या मते ती चाल जास्त उदास झालेय असे कळले. म्हणून अजून थोड्या वेगळ्या प्रकारे मी ह्या कवितेला चाल लावलेय. दोन्ही चाली आपल्यासाठी इथे सादर करतोय. कितपत जमल्या आहेत ते ऐकून सांगा.


पाऊस

मेघांची दाटी गगनी
तू अंत नको पाहूस
क्षण दोन क्षणांची खोटी
बरसेल अता पाऊस....

चल वेचू क्षण हे सखये
ये निघून लवकर आता
मी शब्द उधळतो आहे
दे सूर तुझे या गीता...

कवी: धोंडोपंत


पहिली चालदुसरी चाल

१० टिप्पण्या:

दिलीप बिरुटे म्हणाले...

नमस्कार, देवसाहेब..!

आमच्या धोंडोपंताच्या कवितेला आपण लावलेल्या दोन्ही चाली ऐकल्या पैकी पहिली लैच उदास वाटली.इतकी की, कोणाला तरी ’पोहचवायला’ ;) जात आहोत आणि आपण गात आहात असे वाटले. (बाप रे ! जास्तच बोललो वाटंत ! )

दुसरी चाल मात्र मस्त आहे !!!

चाली लावत राहा....! :)

मी अत्त्यानंद म्हणाले...

हाहाहा! मस्त!
धन्यवाद बिरुटेसाहेब!

अनामित म्हणाले...

dusari chhan ahe

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद अनामिक!

धोंडोपंत म्हणाले...

नमस्कार पंत,

दोन्ही चाली आवडल्या. सुंदर झालेत. अभिनंदन.

कविता सुचतांना मनात असलेली आर्तता पहिल्या चालीत चोख उतरलेय. आम्हाला "हेच" म्हणायचे होते.

आपला,
(व्याकूळ) धोंडोपंत

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद पंत!
खुद्द कविकडून पावती मिळाली. ह्यापरते अजून काय हवे?

अनामित म्हणाले...

सुंदर चाली.

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद अनामिक!

मदनबाण म्हणाले...

दोन्ही चाली छान आहेत,पण मला दुसरी चाल जास्त आवडली.
पंत आपली कविता आवडली.

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद बाणा!