रविवार, २२ फेब्रुवारी, २०१५

पळा पळा पुढे पळे तो


जुळवत मी, ता समोर ता
रचत राहतो नुसत्या कविता ..

तुम्हीच म्हणता येताजाता
का करता हो असल्या कविता ..

हे नुसते रचणे, ता समोर ता
तुम्हास वाटे अर्थहीनता ..

जर सोपे ते लिहिणे कविता
बसती सारे खरडत कविता ..

दिसले असते सर्वत्र कवी
एकही वाचक उरला नसता .. !

कवी: विजयकुमार देशपांडे