सुस्वागतम्! नमस्कार मंडळी! "त्यांची कविता माझे गाणे" हा एक एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना माझ्या कुवतीप्रमाणे चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येतील आणि त्याच बरोबर त्यांच्या चालीही ऐकता येतील. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! आपल्याकडून स्पष्ट आणि परखड मतांची अपेक्षा आहे ज्यामुळे मला इथे सुधारणा करता येतील. आपल्या मार्गदर्शनाचा फायदा घेण्यास मी उत्सुक आहे.
मी लावलेल्या चाली जर कुणाला वापराव्याश्या वाटल्या तर त्या कुणीही खुशाल वापरू शकतं...त्यासाठी माझ्या परवानगीची गरज नाही...
मात्र, इथल्या कविता वापरायच्या असतील तर संबंधित कवी/कवयित्रींची वैयक्तिक परवानगी घ्यावी लागेल हे कृपया लक्षात असू द्या ! अन्यथा ती चोरी ठरेल.

मंगळवार, ३० डिसेंबर, २०१४

तारेही गातात म्हणे...


हरिवंशराय बच्चन यांच्या 'कहते हैं तारे गाते हैं' या कवितेचा स्वैर भावानुवाद

असीम शांती पृथ्वितलावर
कान लावले गगनपटावर
असंख्य, अगणित कंठांमधले तरी न ऐकू ये गाणे
तारेही गातात म्हणे.............

स्वर्ग ऐकतो मधुर गान ते
धरा फक्त इतकेच जाणते
मूक अश्रु ढाळतात तारे दंवबिंदूच्या रूपाने
तारेही गातात म्हणे.............

वरती देव, धरेवर मानव
नभात घुमते गीत नि क्रंदन
राग चढत जातो, अन् अश्रू ढळती पापणकाठाने
तारेही गातात म्हणे.............

अनुवादिका: क्रान्ति साडेकर

ही आहे मूळ रचना

सन्नाटा वसुधा पर छाया,
नभ में हमनें कान लगाया,
फ़िर भी अगणित कंठो का यह राग नहीं हम सुन पाते हैं
कहते हैं तारे गाते हैं

स्वर्ग सुना करता यह गाना,
पृथ्वी ने तो बस यह जाना,
अगणित ओस-कणों में तारों के नीरव आंसू आते हैं
कहते हैं तारे गाते हैं

उपर देव तले मानवगण,
नभ में दोनों गायन-रोदन,
राग सदा उपर को उठता, आंसू नीचे झर जाते हैं
कहते हैं तारे गाते हैं....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: