बुधवार, २२ ऑक्टोबर, २०१४

"आली आली हो दिवाळी"

"आली आली हो दिवाळी"
- ही रांगोळी सांगे दारी
स्वागतास सज्ज राहू
प्रकाशात घरोघरी !

सुसंवादी भेटीत आता
काव्य शास्त्र विनोदाच्या -
एकमेकांना देऊ या
शुभकामना मनीच्या !

करू विना आवाजाने
छान दिवाळी साजरी ,
ठेवू प्रदूषणमुक्त
वसुंधरा ही गोजिरी !

गोडधोड चवदार
खमंगशा फराळात-
भूक गोरगरीबांचीही
नित्य घेऊया ध्यानांत !

कवी: विजयकुमार देशपांडे