सुस्वागतम्! नमस्कार मंडळी! "त्यांची कविता माझे गाणे" हा एक एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना माझ्या कुवतीप्रमाणे चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येतील आणि त्याच बरोबर त्यांच्या चालीही ऐकता येतील. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! आपल्याकडून स्पष्ट आणि परखड मतांची अपेक्षा आहे ज्यामुळे मला इथे सुधारणा करता येतील. आपल्या मार्गदर्शनाचा फायदा घेण्यास मी उत्सुक आहे.
मी लावलेल्या चाली जर कुणाला वापराव्याश्या वाटल्या तर त्या कुणीही खुशाल वापरू शकतं...त्यासाठी माझ्या परवानगीची गरज नाही...
मात्र, इथल्या कविता वापरायच्या असतील तर संबंधित कवी/कवयित्रींची वैयक्तिक परवानगी घ्यावी लागेल हे कृपया लक्षात असू द्या ! अन्यथा ती चोरी ठरेल.

रविवार, १७ ऑगस्ट, २०१४

आयुष्याचा पावाकसा घडविलास रे देवा
माझ्या आयुष्याचा पावा ..

नीट जरी वाजवण्या बघतो
सूर कसा बेसूर उमटतो ..

वाजवतो मी व्यथा जरी
हर्ष नादतो मधुर तरी ..

आनंदे वाजवतो जेव्हा
आर्त आळवणी निघते तेव्हा ..

वाजवून मी थकलो देवा
केला खूप खूप मी धावा ..

आता बोटे माझी थकली
पाव्यानेही मान टाकली ..

घेई परत तुझा तू पावा
शरणागत मी तुजला देवा !


कवी: विजयकुमार देशपांडे

1 टिप्पणी:

mee-videsh.blogspot.com म्हणाले...

मला आवडलेली माझी कविता छान पाहिजे तशी आळवली आपण ! समाधान वाटले.धन्यवाद !