बुधवार, २६ मार्च, २०१४

समेट

सांग साजणा, गुपित आपुले किती कसे आवरू
तू दिसता का मनात फडफडते रे फुलपाखरू -

लाली चढते गाली, ओठी गीत बघे थरथरू
कंप अनामिक देही माझ्या, सांग कसा आवरू -

आठव नुसता मनात होता, मन लागे मोहरू
प्रत्यक्षातच समोर जर तू, किती मला सावरू -

पुरे चोरट्या गाठीभेटी, उघड उभयता करू
चल, सर्वांच्या साक्षीने रे, फेरे सात धरू .

कवी: विजयकुमार देशपांडे

३ टिप्पण्या:

विजयकुमार देशपांडे म्हणाले...

अगदी मनापासून गायलंत. लिखाणाचे चीज झाल्यासारखे वाटले. धन्यवाद !

aruna म्हणाले...

good. feelings of the poem come through.

प्रमोद देव म्हणाले...

देशपांडेसाहेब आणि अरूणाताई, दोघांनाही मन:पूर्वक धन्यवाद.