धोंडोपंतांची ही अजून एक सशक्त गजल. मूळ गजलेतील काही निवडक शेर मी चाल लावण्यासाठी घेतलेत. चाल ऐकून आपले मत जरूर नोंदवा.
मंडळी,सांगावयास आनंद होतोय की ही माझी ५०वी चाल ठरलेय.
जाता जाता
जिथे तिथे मी हर्ष पेरला... जाता जाता
आनंदाचा मळा फुलवला... जाता जाता
समोर तू येताच अचानक मी गडबडलो
एकच ठोका हृदयी चुकला... जाता जाता
दोन शेर लिहिल्यावर होती गझल रखडली
तू दिसल्यावर तिसरा सुचला... जाता जाता
असा काय गंभीर गुन्हा मी केला आहे?
एकच चिमटा तुला काढला... जाता जाता
तुझे इशारे तुझ्या खुणा लाजवाब होत्या
अर्थ मला पण उशिरा कळला... जाता जाता
हासत खेळत भेट आपुली झाली तरिही
कंठ का बरे तुझा दाटला... जाता जाता
खूप प्रयासाने थोपवले होते अश्रू
बांध शेवटी उगीच फुटला... जाता जाता
"संवादाची तुझ्या ’अगस्ती’ ही तर किमया"
"रडणाराही अखेर हसला... जाता जाता"
कवी:धोंडोपंत
चाल इथे ऐका.
२ टिप्पण्या:
अभिनंदन बुवा,
याच वेगाने २००९ याच वर्षात शंभरीही गाठाल याची खात्री आहे. पुढील संगीतप्रवासासाठी शुभेच्छा
धन्यवाद पंडीतजी!
कर्ते करविते तर आपणच आहात.
टिप्पणी पोस्ट करा