रेमी डिसोजा हे नाव मला तसे नवीन असले तरीही महाजालावर पक्के मुरलेले हे व्यक्तीमत्व दिसतंय. मराठी आणि इंग्रजीमधून ह्यांनी गद्य आणि पद्य लेखन खूपच मोठ्या प्रमाणावर केलेलं दिसतंय.
माझा तरूण मित्र प्रशांत मनोहरने रेमीच्या जालनिशीवरची ही खाली दिलेली कविता वाचली आणि मला त्याला चाल लावायचे आव्हान दिले. ह्या कवितेत प्रत्यक्ष कविनेही म्हणून ठेवलंय की..."ही कविता फक्त वाचता येते; गाता नाही येत."
मी कविता वाचली आणि लक्षात आले की त्याला चाल लागू शकते. म्हणून मग त्याचे आव्हान स्वीकारले आणि त्याप्रमाणे जी चाल साकारली ती इथे देत आहे. ऐका आणि कितपत जमलेय तेही सांगा.
अशी कविता: एक कोडें
ह्या कवितेत रूपके नाहीत, अलंकार नाहित.
ही कविता फक्त वाचता येते; गाता नाही येत.
ही कविताच एक रूपक आहे, अलंकार आहे,
वास्ताविकतेचा. या कवितेस काय म्हणावे?
कवी:रेमी डिसोजा
इथे चाल ऐका
१० टिप्पण्या:
मिसळपाववरील तात्या अभ्यंकरांच्या चमच्यांची आणि तुमच्या खुशमस्कर्यांची यादी लेबलमधे लावली आहे काय?
तुम्हीही व्हा की खुश मस्करे! तुमचेही नाव लावतो यादीत. :P
येताय काय मानसपंत ? पण निदान एक कविता करा..ज्याला मला चाल लावता येईल. पाहा विचार करा. :)
अहो,आलाच आहात तर निदान चाली ऐका आणि त्यावर तुमचे खरेखुरे मत द्या की. अगदी अप्रिय असले तरी द्या. ते इथे कायमचे राहील.
आम्ही चमच्यांबरोबर उलथणी देखिल बाळगतो म्हटलं!
केव्हाही या इथे. घर आपलेच आहे. :)
तुमचा आणि तात्याचा चमचा बनावे एवढे कुठले आमचे भाग्य? तो मान तुमचा. उलथणी तुम्ही ’बाळगता’ म्हणजे त्यांचेही चमचेच झाले असणार! तेव्हा नकोच ते.
मी कविता करतोच, पण त्याला तुम्ही चाल लावणार म्हटल्यावर त्या आंतरजालावर प्रकाशित करण्याचेही धैर्य उरले नाही.
अपघाताने तुमच्या अनुदिनीवर आलो. पण तिथे उपलब्ध असलेल्या गाणांच्या चाली ऐकण्याचा मानही त्या उजव्या बाजूच्या लेबल्स मधे असलेल्या मान्यवरांचाच! आमची ती लायकी नाही. धर्मशाळा कायम उघड्या असतात म्हणून कुणी स्वत:चं घर सोडून तिथे मुक्कामाला जात नाही.
मर्जी तुमची मानसपंत!
आम्हाला तात्या काय आणि तुम्ही काय,दोघेही सारखेच आहात.
पण दूर्दैवाने तुम्हाला तसे वाटत नाही त्याला मी काय करणार!
आणि हो,माझ्या कोणत्याच जालनिशीशी तात्याचा अर्थाअर्थी संबंध नाहीये...अगदी प्रतिसादापुरताही. हे आपल्याला कळू शकेल...पण ते पाहण्यासाठी दृष्टी साफ हवी.
तुम्ही जे लिहीले आहे त्यामुळे नकळतपणे तुम्ही ह्या सर्व कवि/कवयित्रिंचा अपमान केला आहे...हे तुमच्या लक्षात आलंय का? तात्याशी तुमचे जर काही वैर असेलच तर त्यासाठी त्याच्या जालनिशीवर जाऊन काय ते प्रतिसाद द्या की. मी तुम्हाला तर ओळखत नाही(निदान हे जे नाव इथे तुम्ही लिहीले आहे त्या नावाने)आणि तुम्हीही अपघाताने इथे आलात असे म्हणताय.
मग नको त्या संदर्भरहित गोष्टींचा उच्चार इथे करण्यामागे तुमचा काय हेतू आहे ते मला तरी समजले नाही.
असो.
आम्ही धर्मशाळा उघडलेय ती कुण्या पांथस्थाने घटकाभर विसावा घ्यावा म्हणून. त्याचा लाभ घ्यावा की न घ्यावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही कधी जबरदस्ती केलेली नाही,करत नाही आणि करणारही नाही.
आपण आपल्या घरात सुखाने राहा.
तथास्तु!
विसु:जमल्यास खर्या नावाने प्रतिसाद द्या.
With all due respect. Nahi avadali.
Dhondapantanchya "paus" kavitela lavelya chali OK types hotya. Tya pan vishesh avadalya nahi. Tyatlya tyat, "paus" kavitechi, pahili chaal bari hoti, dusri peksha.
Matra hya kavitechi ("ek kode" chi) chaal, matra mulich nahi jamli. Ti kavitach tyache ek karan asu shakel.
Ajun thoda spashta sagacha mhantla tar, tumchya awaja mule sudhaa effect jaat asel. Tumhi tyapeksha harmonium gheun chaal aikavlyas jasta appreciate karu shken.
Spasha bolalya baddal maaf kara. dhanyawad.
अनामिक साहेब,धन्यवाद! आपल्यासारख्या स्पष्ट आणि परखड मतांची खरंच जरूर आहे. त्यामुळेच तर स्वत:चे कुठे चुकले हे कळू शकते असे माझेही मत आहे. त्यामुळे भविष्यात काही सुधारणा होणे शक्य आहे असेही मला वाटते आणि त्या दृष्टीने मी सतत प्रयत्नशील राहीन.
हार्मोनियमबद्दल मी एक सांगेन की मला ते वाजवता येत नाही.मला तालही कळत नाही आणि तालात गाणेही जमत नाही. मला माझ्या आवाजाच्या आणि गायनाच्या मर्यादा माहित आहेत;पण दूर्दैवाने माझ्या संपर्कात अशी कुणी व्यक्ती नाहीये जी कुणी ह्या चाली गाऊ शकेल.
तरीही भविष्यात जास्त चांगल्या चाली लावण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन देतो.
अनामिक साहेब, तुमचे पुन्हा एकदा मन:पूर्वक धन्यवाद!
ह्यापुढेही आपले मत इथे ठणकावून मांडत चला असे आवाहन मी करतो.
Dhanywad, maza mat positively ghetlya baddal.
BTW, mi attach tumchi Jayshree Ambaskar yanchya bhul kavitela lavleli chaal aikli. Ti matra manapasun avadali.
धन्यवाद अनामिक!
केलेले काम कुणाला आवडले तर नवीन काम करायला स्फुर्ति येते आणि नाही आवडले तरी आपल्यात काय कमी आहे हे कळत असतं.ज्यामुळे सुधारणेला गती मिळते.
त्यामुळे मी दोन्ही प्रतिक्रियांचे मनापासून स्वागतच करतो.
प्रमोद,
तुमच्या ब्लॉग वरचे प्रतिसाद पाहिले. आणि आता ही माझी कैफियत नमूद करतोय; काही उशीर झालेला नाही.
तुम्ही गायलेली "अशी कविता..." ऐकून वाटले ती "कविता' होती, आता "गाणे" झाली. धन्यवाद. मनातली रुखरुख कमी झाली, संपली नाही.
मला नेहमीच वाटते, कवितेला गेयता हवी.
कविता लिहिणे हा काही माझा पेशा नाही. किंवा लेखन ही माझा पेशा नाही. तसेच शास्त्रीय संगीताचा मी दर्दी नाही. पण संगीत समजते. लिहिणे अपरिहार्य आहे म्हणून लिहितो.
ही कविता कोडे अशासाठी:
पहिल्या दोन ओळीत या आणि माझ्या ईतर काही कवितांची लक्षणे दिलीत.
नंतरच्या दोन ओळीत वास्तविकतेचा -- आजच्या वास्तविक स्थितीचा -- उल्लेख आहे.
पुराण काळी "श्रृति -स्मृती" पद्यात रचल्या होत्या. आणि हा प्रघात नंतरही चालत आला -- संस्कृत, प्राकृत, प्रादेशिक भाषांत. आजही लोकगीते लोकबोलीत रचली जातात. हे सारे साहित्य मौखिक (mnemonic) पद्धतीने पिढ्यान पिढ्या वारसाने आले. कागद आणि छपाई फारच नंतर आले.
कधीकाळी मी पण बर्री-वाईट गाणी लिहिली होती, पण त्याना गेयता होती.
आणि वाटेवर माझ्या रचनांचे "सांस्कृतिक संकरण" (cultural hybridization) कधी झाले समजलेच नाही. तरीही मी आग्रहाने असेच म्हणेन, मराठी असो की इंग्रजी, ही रेमीची बोलीभाषा आहे. मी अनेक भाषांत लोकगीते प्रत्यक्ष ऐकलीत. ती मलातरी हृदयस्पर्शी वाटली. माझ्या कोणत्याही कवितेस मला नाही वाटत त्यांची सर कधीकाळी येईल.
रेमी डिसोजा
धन्यवाद रेमी!
आपण प्रामाणिकपणाने काम करत राहायचं. ते कुणाच्या तोडीचं होतंय/नाही होत ह्याची तमा बाळगायची नाही. त्याची योग्यायोग्यता रसिकांवर सोपवायची. तेच आपले मायबाप.
टिप्पणी पोस्ट करा