सुस्वागतम्! नमस्कार मंडळी! "त्यांची कविता माझे गाणे" हा एक एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना माझ्या कुवतीप्रमाणे चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येतील आणि त्याच बरोबर त्यांच्या चालीही ऐकता येतील. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! आपल्याकडून स्पष्ट आणि परखड मतांची अपेक्षा आहे ज्यामुळे मला इथे सुधारणा करता येतील. आपल्या मार्गदर्शनाचा फायदा घेण्यास मी उत्सुक आहे.
मी लावलेल्या चाली जर कुणाला वापराव्याश्या वाटल्या तर त्या कुणीही खुशाल वापरू शकतं...त्यासाठी माझ्या परवानगीची गरज नाही...
मात्र, इथल्या कविता वापरायच्या असतील तर संबंधित कवी/कवयित्रींची वैयक्तिक परवानगी घ्यावी लागेल हे कृपया लक्षात असू द्या ! अन्यथा ती चोरी ठरेल.

मंगळवार, २८ जुलै, २००९

ए आई, सांग नाऽऽऽऽऽ, कधी येइल बाबा घरा ?

विशाल कुलकर्णीने लिहिलेले हे एक बालगीत वाचून मला चाल लावाविशी वाटली. जमलेय का पण ती चाल?
तुम्हीच ऐका आणि ठरवा.

ए आई, सांग नाऽऽऽऽऽ, कधी येइल बाबा घरा ?

ए आई, सांग नाऽऽऽऽऽ, कधी येइल बाबा घरा ?
ए आई......,सांग नाऽऽऽऽऽ!

आता गोष्ट नको आम्हाला,
गाण्यातला रस संपला!
लुटुपुटीच्या भातुकलीचा,
आला खुप खुप कंटाळा ऽऽऽऽ!
ए आई, सांग नाऽऽऽऽऽ, कधी येइल बाबा घरा ?

नकोच आई मजला,
चॉकलेटचा तो बंगला !
अन बर्फीची ती झाडे,
इथे आहेत, हवीऽऽऽऽ कुणाला?
ए आई, सांग नाऽऽऽऽऽ, कधी येइल बाबा घरा ?

राजपुत्र अन परीराणीच्या,
गोष्टींचा स्टॉकही संपला !
टॉम अँड जेरी, पापायनेही,
बघ जीव; आमचाऽऽऽ उबला !
ए आई, सांग नाऽऽऽऽऽ, कधी येइल बाबा घरा ?

चिवचिव करती चिमणपिले,
चोचीतच घास राहीला !
असेल का गं गेला ?
त्यांचाही बाबा टूरऽऽऽ ला?
ए आई, सांग नाऽऽऽऽऽ, कधी येइल बाबा घरा ?

बघ चांदोबा तो रुसला,
चांदण्याही..., बघ धुसफुसल्या !
अंगाई नच रुचे आम्हाला,
आम्हा हवाय बाबा......, थोपटायलाऽऽऽऽऽ !
ए आई, सांग नाऽऽऽऽऽ, कधी येइल बाबा घरा ?

कवी:विशाल कुलकर्णी

चाल इथे ऐका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: