विवेक काजरेकरांच्या आवाजात ही चाल ऐका. ह्यातलं संगीत संयोजनही त्यांनीच स्वत:च्या संगणकावर केलंय.
प्राजु उर्फ प्राजक्ता पटवर्धन ही देखिल ह्या महाजालावरील एक सशक्त लेखिका/कवयित्री आहे. मनोगत, मिसळपाव अशा नामांकित मराठी संकेतस्थळांवर ती लेखन करत असते. "विठू सांगे" ही तिची कविता..खरे म्हणायचे तर हा अभंग वाचून मला चाल स्फुरली (जय संत प्राजु). पण हा अभंग इतका लांबलचक आहे की सर्व कडव्यांना वेगवेगळी चाल लावायची म्हणजे माझी (नसलेली) प्रतिभा तोकडी पडायला लागली. ;) म्हणून मग मी निवडक कडवी घेऊन चाल रचली.
विठू सांगे...
आषाढाचा मास । दर्शनाची आस ।
होती तुझे भास । पांडुरंगा । ।
साठवावे नेत्री । भक्तीचिया गात्री ।
दिवसा नि रात्री । रूप तुझे । ।
खोवलेला शिरी । तुरा हा मंजिरी ।
वसतो पंढरी । विठू राया । ।
भिवरेच्या तिरी । उभा विटेवरी ।
कर कटेवरी । ठेवोनिया । ।
काळा नि सावळा । प्रेमाचा पुतळा ।
मनाचा निर्मळा । पांडुरंग । ।
नामयाचा घास । घेऊनिया खास ।
जागवली आस । भक्तीयोगे । ।
घेऊनी वळण । दळितो दळण ।
करितो राखण । जनाईचे । ।
तुकोबाचा भार । घेई शिरावर ।
परि गुन्हेगार । आवलीचा । ।
काय त्या म्हणावं ? देव की मानव ।
कोणाला कळाव ? गारूड ते । ।
श्रद्धा अंधश्रद्धा । फरक तो करा ।
परी कास धरा । प्रयत्नांची । ।
प्रयत्नाच्या अंती । ध्येयाची ती पूर्ती ।
करा श्रम भक्ती । विठू सांगे । ।
जाणा एक सर्व । विश्व हाच देव । ।
सांगे ज्ञानदेव । सकलांना । ।
प्राजू म्हणे ऐसे । विश्वाला जपावे ।
प्रयत्न करावे । ध्येयासाठी । ।
कवयित्री: प्राजु
४ टिप्पण्या:
प्रयोग चांगले आहेत..शुभेच्छा !!!
धन्यवाद बिरुटेसाहेब.
kaka,
prajuchya sarv kavitana chhan chaal lavali ahe.
sarv kavita mast paiki surat aaikayachi soy kelit tumhi.
:)
धन्यवाद अनामिक!
टिप्पणी पोस्ट करा