सुस्वागतम्! नमस्कार मंडळी! "त्यांची कविता माझे गाणे" हा एक एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना माझ्या कुवतीप्रमाणे चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येतील आणि त्याच बरोबर त्यांच्या चालीही ऐकता येतील. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! आपल्याकडून स्पष्ट आणि परखड मतांची अपेक्षा आहे ज्यामुळे मला इथे सुधारणा करता येतील. आपल्या मार्गदर्शनाचा फायदा घेण्यास मी उत्सुक आहे.
मी लावलेल्या चाली जर कुणाला वापराव्याश्या वाटल्या तर त्या कुणीही खुशाल वापरू शकतं...त्यासाठी माझ्या परवानगीची गरज नाही...
मात्र, इथल्या कविता वापरायच्या असतील तर संबंधित कवी/कवयित्रींची वैयक्तिक परवानगी घ्यावी लागेल हे कृपया लक्षात असू द्या ! अन्यथा ती चोरी ठरेल.

शनिवार, ४ एप्रिल, २००९

उन्मुक्त!

सौ.जयश्री कुलकर्णी-अंबासकर! महाजालावरील मराठी संकेतस्थळांवरची एक लोकप्रिय कवयित्री!
सुप्रसिद्ध संगीतकार श्री.विवेक काजरेकर ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा एक संच आहे "स्पर्श चांदण्यांचे". त्यात जयश्रीची दोन स्वतंत्र गाणी आहेत आणि एका द्वंद्व गीतातही तिचा अर्धा सहभाग आहे.ही गाणी सुप्रसिद्ध गायक श्री.सुरेश वाडकर आणि पद्मजा फेणाणी ह्यांनी गायलेली आहेत.
तिच्या गीतांचा एक संपूर्ण संच "सारे तुझ्यात आहे" ह्या नावाने प्रसिद्ध झालाय. संगीतकार आहेत अभिजित राणे आणि गायक गायिका आहेत स्वप्नील बांदोडकर,देवकी पंडीत आणि वैशाली सामंत.
तसेच "तुझा चेहरा" ह्या गायिका संगीता चितळेने गायिलेल्या गीत संचात जयश्रीचे एक गीत आहे.
अशा ह्या सुप्रसिद्ध कवयित्रीच्या "उन्मुक्त" ह्या कवितेला मला चाल लावायला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.२ टिप्पण्या:

जयश्री म्हणाले...

देवकाका....... माझ्या कवितेला इतकी सुरेख चाल देऊन सन्मान केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद :)

चाल मनापासून आवडेश :)

आणि तुमचं चिरतारूण्य असंच बहरत राहो !!

मी अत्त्यानंद म्हणाले...

धन्यवाद जयश्री.