गुरुवार, ७ जुलै, २०११

निजधामा नेई



मनाच्या अवस्था
आसक्ती विरक्ती
विठू तुझी भक्ती
हेच सत्य ||

तुझ्या दर्शनाचा
अहोरात्र ध्यास
येताजाता श्वास
नाम जपे ||

नको नको झाला
मायेचा पसारा
भौतिकाचा सारा
डामडौल ||

प्रपंच मी केला
नेटकाच देवा
आता तुझी सेवा
हेच ब्रीद ||

तुवा सोपविले
कार्य पुरे होई
निजधामा नेई
पांडुरंगा ||

कवयित्री: क्रान्ति


क्रांतिचा हा अभंग वाचून मला तो चालवावासा वाटला...कसा तो ऐका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: