सुस्वागतम्! नमस्कार मंडळी! "त्यांची कविता माझे गाणे" हा एक एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना माझ्या कुवतीप्रमाणे चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येतील आणि त्याच बरोबर त्यांच्या चालीही ऐकता येतील. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! आपल्याकडून स्पष्ट आणि परखड मतांची अपेक्षा आहे ज्यामुळे मला इथे सुधारणा करता येतील. आपल्या मार्गदर्शनाचा फायदा घेण्यास मी उत्सुक आहे.
मी लावलेल्या चाली जर कुणाला वापराव्याश्या वाटल्या तर त्या कुणीही खुशाल वापरू शकतं...त्यासाठी माझ्या परवानगीची गरज नाही...
मात्र, इथल्या कविता वापरायच्या असतील तर संबंधित कवी/कवयित्रींची वैयक्तिक परवानगी घ्यावी लागेल हे कृपया लक्षात असू द्या ! अन्यथा ती चोरी ठरेल.

शनिवार, ४ एप्रिल, २००९

एक भावगीत!

मिसळपाव ह्या संकेतस्थळावर नियमितपणे लेखन करणारे रामदास अधून मधून कविताही करतात. त्यातलीच एक कविता "एक भावगीत" वाचताच मला सुचलेली चाल माझ्या नेहमीच्या चालींपेक्षा जरा वेगळीच आहे असे मला वाटते.

एक भावगीत

मला सोसेना उबारा ...मला सोसेना हिवाळा
मी होऊन खारोटी
तुझ्या ओंजळीत
घेईन विसावा.
* * * *
मला सोसेना दुरावा .... मला सोसेना दुरावा
मी होऊन चांदणे
तुझ्या अंगणात
मागेन जोगवा.
* * * *
माझ्या प्रेमाची शपथ ....गळाभरून शपथ
मी रंगून विड्यात
तुझ्या ओठावर
सांगेन ओळख.

कवी: रामदासखालील विजेटवर चाल ऐका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: